राहुल गांधींना धमकी देणाऱ्या नेत्यांवर कारवाई करा; काँग्रेसची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या महायुतीच्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड व भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन यावल तालुका व शहर कॉंग्रेस कमेटीच्या वतीने पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांना देण्यात आले आहे.

 

तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, यावल शहराध्यक्ष कदीर खान, पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटिल, हाजी शब्बीर खान, नगर परिषदचे माजी उपनगराध्यक्ष असलम शेख नबी, अनिल जंजाळे,बशीर तडवी, अमोल भिरूड,विक्की गजरे, इमरान पहेलवान यांच्यासह प्रमुख पदधिकारी उपस्थित होते.

Protected Content