‘या’ दोघांनी मिळून केला शाम दीक्षितांंचा गेम !

1998748a 3ec4 4fb2 a947 136e560d700a 1

 

जळगाव प्रतिनिधी । शहरातील देविदास कॉलनीतील साईबाबा मंदिराजवळ शाम दीक्षित या तरुणाचा खून झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार दोन जणांनी मिळून शामचा निर्घृण खून केला. दोघं आरोपींची नावं  समजली असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. दरम्यान, यातील एक आरोपी हा नुकताच एका खून प्रकरणातून जामिनावर बाहेर आला असल्याचे कळते.

 

या संदर्भात अधिक असे की, शहरातील देविदास कॉलनीतील साईबाबा मंदिराजवळ शाम दीक्षित या तरुणाचा पहाटे खून झाल्याचे उघडकीस आले होते. पोलीस तपासात शाम दीक्षित याने चार जणांसह शहरातील बस स्थानक लगत असलेल्या रिगल एका हॉटेलमध्ये मध्यरात्री १ वाजेपर्यंत मद्य प्राशन केले. पोलिसांनी रात्री सोबत मद्यपान करणाऱ्या दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर शाम दीक्षित सोबत मुन्ना नामक तरुण असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी अधिक तपास केला असता मोहितराज उर्फ मुन्ना अशोक कोळी (रा. सबजेल मागे ,जळगाव) असे पूर्ण असल्याचे कळले. तर त्याला खून करण्यात मदत करणारा दुसरा संशयिताचे नाव सनी उर्फ चाळीस वसंत पाटील (रा.रामेश्वर कॉलनी) असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांनी आज पहाटे पासून दोघांचा शोध सुरु केला असून त्यांच्या शोधार्थ पथकं रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, खुनाचे नेमके कारण दोघं संशियत सापडल्यावरच समजू शकणार आहे.

 

एक संशयित खुनाच्याच गुन्ह्यातून जामिनावर

 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शाम दीक्षित या तरुणाचा वाद हा मुन्नासोबत झाल्यानंतर दोघं जण घराकडे रवाना झाले. त्यानंतर मंदिराजवळ पोहचल्यावर दोघांमध्ये आणखी काही वाद झाला. त्यांनतर खून करण्यात आला. या खुनात सनी उर्फ चाळीस वसंत पाटील या संशयिताचे नाव समोर आले आहे. दरम्यान, सनी उर्फ चाळीस हा जळगावातील गाजलेल्या चिंग्या खून प्रकरणातील आरोपी आहे. काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला आहे. जामिनावर बाहेर आल्यावर पुन्हा खुना सारख्या गंभीर गुन्हा केल्यामुळे पोलीस देखील आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

Protected Content