डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात पालकांची कार्यशाळा

WhatsApp Image 2019 08 26 at 12.13.04 PM

जळगाव, प्रतिनिधी | महाराष्ट्र, आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ विवेकानंद प्रतिष्ठान संचालित डॉ अविनाश आचार्य विद्यालयातील पूर्व प्राथमिक विभागात पालकांची कार्यशाळा रविवार २५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती.

 

“शिक्षकांची साथ पालकांचा प्रतिसाद, यानेच होईल विद्यार्थ्यांचा विकास”या पार्श्वभूमिवर आधारित गुरुवार २२ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शिक्षण मंडळ, विवेकानंद प्रतिष्ठान संचलित, डॉ अविनाश आचार्य विद्यालयातील, पूर्व प्राथमिक विभागात गणेशोत्सनिमित्ताने पाल्य व पालक अशा जोडीने गणपती मूर्ती तयार केली. यासाठी स्पर्धा घेण्यात आली. तयार केलेल्या शाडू मातीच्या गणपतीची मूर्तीची स्थापना घरीच करून पर्यावरण वाचवण्याचे मूल्य रुजवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभ्यास समजून घेण्यासाठी दि २५ रोजी पालकांनी कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या कोषाअध्यक्ष हेमा अमळकर व शालेयसमिती सदस्य रचना जोशी व मुख्यध्यपिका कल्पना बावस्कर उपस्थित होत्या. शिक्षक सर्व विषयाचा विद्यार्थ्यांना अनौपचारिक, आनंददायक व क्रियाआधारीत अनुभव कशाप्रकारे देतात याचा स्वानुभव या कार्यशाळेतून पालकांना मिळाला. या कार्य शाळेला पालकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. पालकांनी परत लहान होऊंन शाळेत गेल्यासारखे वाटले एक नवा विचार करण्याचीदृष्टी मिळाली. ऐमआय ई. बी.च्या हया माध्यमात आमंच्या मुलाचे भविष्य उज्ज्वल आहे हे आम्हाला कळले व या निर्णयाचा आम्हाला आंनद आहे, अश्या प्रकारच्या अनेक चांगल्या प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या. यशस्वीवितेसाठी मुख्यध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Protected Content