धरणगाव तालुक्यातील तरूणाचा टोकाचा निर्णय : परिसरात हळहळ

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील तालुक्यातील फुलपाट टाकळी गावात राहणार्‍या एका ३० वर्षीय तरुणाने बांभोरी गावाजवळील गिरणानदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी घडली आहे.

दरम्यान गावातील नागरिकांनी ओळख पटविली असून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. श्याम प्रताप भिल (वय-३०) रा. फुलपाट टाकळी तालुका धरणगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे

या संदर्भात सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, श्याम भील हा त्याचा भाऊ भुरा भील याच्यासोबत राहत होता. १० वर्षांपूर्वी त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले होते. तर कोरोना काळात त्यांच्या पत्नीचेही निधन झाले. शिवाय काही महिन्यांपासून तो आजारी देखील होता. वाळूच्या ठेलावर तो काही महिन्यांपूर्वी काम करत होता. पत्नीच्या मृत्यूनंतर श्याम भील हा तणावात होता. त्यामुळे गुरुवार ६ एप्रिल रोजी बांभोरीगावाच्या नजीक असलेल्या गिरणा नदीच्या पुलावरून थेट त्याने उडी घेतली. पुलावरून उडी घेण्यापूर्वी २ जणांनी त्याला टोकले होते. अखेर त्याने पुलावरून थेट उडी घेत आपली जीवन यात्रा संपविली.

दरम्यान, हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जळगाव तालुका पोलिसांना कळविले. जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील, पोहेकॉ अनिल फेंगडे, चेतन पाटील, होमगार्ड अशोक वाघ यांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. शेवटची वृत्त हाती आले, तेव्हा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Protected Content