जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मैत्रीणीसोबत पायी जात असलेल्या विद्यार्थीनीच्या हाताला झटका देवून महागडा मोबाईल लांबविल्याची घटना मु.जे.महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलाजवळ घडली. याबाबत मंगळवारी २० सप्टेंबर रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, दर्शना बाळासाहेब कांबडे (वय-२१) रा. नवी मुंबई, ह.मु. कुसूमाई मुलींचे वसतीगृह, जळगाव ही विद्यार्थीनी शहरातील फिनीक्स ॲकडमी येथे स्पर्धा परिक्षाची तयारी करत आहे. सोमवारी १९ सप्टेबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास दर्शना ही तिची मैत्रीण तेजस्वीनी बेलकर हिच्या सोबत जेवण करून वसतीगृहाकडे एकलव्य संकुलाकडून पायी जात होते. त्यावेळी अचानक मागून विनानंबरच्या दुचाकीवर अज्ञात तीन जण येवून दर्शनाच्या हाताला झटका देवून ९ हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकवून पसार झाले. यात दर्शना ही खाली पडल्याने दोन्ही पायाला लागले. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवार २० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता अज्ञात तीन जणांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहे.