सासरच्या मंडळींकडून विवाहितेच्या बहिणीचा विनयभंग : चार जणांविरोधात गुन्हा

पाचोरा प्रतिनिधी । येथील कालिका नगरमधील विवाहितेचा बहिणीच्या सासरच्या मंडळींकडून विनयभंग केल्याची घटना घडली असुन या घटनेप्रकरणी पाचोरा पोलीसांत चार जणांविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विवाहितेचा विवाह ७ वर्षांपूर्वी बोदर्डे ता. भडगाव येथील भाऊसाहेब दयाराम पाटील यांच्याशी झाला होता. दरम्यान पती व पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून कौटुंबिक वाद होत होता. त्यामुळे निलम ही आपल्या सहा वर्षांच्या मुलासह गेल्या सात महिन्यांपासून पाचोरा येथील कालिका नगर मधील वास्तव्यास असलेल्या आई व भाऊ सोबत राहत होती. दरम्यान दि.८ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास निलम हीचे पती भाऊसाहेब दयाराम पाटील, दयाराम तोताराम पाटील (सासरे), शांताराम दयाराम पाटील (चुलत सासरे) व दिपक पाटील हे चारचाकी वाहनामध्ये  कालिका नगर येथे येवुन अंगणात खेळत असलेला निलम हीचा मुलगा आयुष यास कोणास काही एक न सांगता सोबत घेऊन जात असतांनाच सदरचा प्रकार विवाहितेच्या बहिणीच्या लक्षात आला.

सासरकडील मंडळींना आयुष यास घेऊन जाऊ नका, त्याची आई घरी नाही. अशी विनवणी करीत असतानाच त्याचा राग आल्याने भाऊसाहेब पाटील व सासरच्या मंडळींनी गाडीतुन उतरुन मुलीस मारहाण केली. व तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. तसेच तिचा भाऊ सागर पाटील यास ही मारहाण केली. सदर घटनेप्रकरणी संबंधित मुलीच्या फिर्यादीवरून विवाहितेच्या पतीविरोधात भाऊसाहेब पाटील, सासरे दयाराम पाटील, चुलत सासरे शांताराम पाटील, व दिपक पाटील या चौघांविरुद्ध पाचोरा पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विजया वसावे करीत आहे.

 

Protected Content