यावल तालुक्यातील रस्ते दुरूस्त करण्याची मागणी; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

यावल प्रतिनिधी । तालुक्याच्या पायथ्याशी असलेल्या अतिदुर्गम आदिवासी भागातील बोरखेडा ते तिळया अंधारमळी व मोहमांडली रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून या तिन्ही रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी अदिवासी एकता तडवी मंचातर्फे प्रांत अधिकारी यांना निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

गावात१००% आदिवासीचा रहिवास आहे. दवाखाने, बाजार, शाळा कॉलेज या सुविधा सर्व फैजपूर शहरामध्ये असल्याकारणाने फैजपूर जाण्यासाठी या अतिदुर्गम क्षेत्रातील खडतर मार्गातुन जाण्यासाठी एकमेव हाच एक पर्यायी रस्ता असुन तो ही अत्यंत खराब असल्यामुळे स्थानिक आदीवासी बांधवांचे ये-जा करतांना हाल होतात. कोणत्याही लोकप्रतिनीधी यांनी आद्यपही मदतीचा हात दिलेला नाही. आदिवासी एकता मंच कडून सदरचा रस्ता दुरुस्ती न झाल्यास उपोषनास बसू असा  इशारा तक्रार निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे. 

यासंदर्भातील निवेदन प्रातं अधिकारी कैलाश कडलग फैजपूर यांना देण्यात आले असुन सदरचा रस्ता शासनाच्या योजनेत मंजूर आहे किंवा नाही व मंजूर असेल तर रस्ताचे काम का केले नाही, या विषयी चौकशी करावी व आदिवासी बांधवांचे समस्या सोडवावी, अन्यथा आदिवासी एकता मंच (महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल असे ही निवेदनात म्हटले आहे. या प्रसंगी आदिवासी एकता मंच चे जिल्हासंघटक रब्बील तडवी, यावल तालुका अध्यक्ष सरदार तडवी, मुस्तफा तडवी, फरीद तडवी, जहागीर तडवी, समीर तडवी आदी उपस्थित होते.

Protected Content