रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी घेत कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील दहिवद  येथील एका तरुण शेतकऱ्याने  कर्जबाजारी पणास कंटाळून शहरातील खाजगी रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

प्रविण शिवाजी पाटील (देसले) असे मयताचे नाव असून ते अमळनेर येथील डॉ अनिल शिंदे यांच्या नर्मदा मेडिकल फाऊंडेशन मध्ये उपचारासाठी दाखल होते. त्यांचा शेती व्यवसाय असल्याने, शेतीत सततची नापीकी तसेच यामुळे घेतलेले कर्ज व सावकारी कर्ज फेड न झाल्याने,ते मानसिक तणावात होते अशी माहिती त्यांच्या नातलगांनी दिली.

ते कर्जांस कंटाळले होते, त्यातच दुर्धर व्याधी व आजारामूळे खर्च न पेलावत नसल्याने त्यांनी सोमवार दिनांक 9 रोजी मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारांस  नर्मदा मेडिकल फाऊंडेशन  इमारतीच्या दुस-या मजल्यावरून उडी घेऊन  आत्महत्या केली.ही घटना ग्रामिण भागात पसरताच अनेकांनी दुःख व्यक्त केले.त्यांच्या पश्चात पत्नी, आई, 1 मुलगा, दोन मुली, भाऊ असा परिवार  असून अमळनेर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष देसले यांचे ते बंधू होत.

 

Protected Content