तापी काठावरच्या दुसखेड्यात भीषण पाणी टंचाई

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तापी नदीच्या काठावर वसलेल्या दुसखेडा गावाला भीषण पाणी टंचाई असून यामुळे येथील ग्रामस्थ प्रचंड संतापले आहेत.

 

दुसखेडा तालुका यावल या गावात मागील दोन ते तिन महीन्यांपासुन पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई भासत असुन , गावर्‍यांना गावापासुन सुमारे चार किलो मिटर लांब अंतरावरुन महिलांना व लहान मुलींना डोक्यावर हंडे घेवुन पाणी आणावे लागत आहे. गावात अशी पाणीटंचाईची भयावह करणारी स्थिति असतांना मात्र येथील ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असलेले ग्रामसेवक हे दोन महिन्या पासून गावात हजेरी लावली नसल्यामुळे कार्यालय बंद असल्याने ग्रामस्थांनी आपली समस्या, व्यथा व अडचण कुणाकडे मांडावी असा संतप्त प्रश्न गावकर्‍यांना पडला आहे .

 

येथील ग्रामस्थमडळी ही मोठया संख्येत आज गावातील समस्या घेऊन यावल पंचायत समिती कार्यलयात  गटविकास अधिकारी यांची भेट घेणार आहे.  याशिवाय येथील १७ लाभार्थीचे प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर असून नमुना न.८ घराच्या उतारा लाभाथ्यांना यावल येथे मागत असून ग्रामसेवक येत नसल्यामुळे  ग्रामस्थांचे प्रश्न सुटत नसल्याने प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

 

दुसखेडा गावात ग्रामसेवकाच्या  अभावी रहीवाशी दाखले घराचा उतारा दारीद्ररेषेच्या दाखला सह विविध प्रकारच्या  कागदपत्रे करीता ग्रामस्थांना अडचणी येत आहे. या समस्यांचे निराकरण करण्यात यावे अशी मागणी दुसखेडा येथील नागरिकांनी केली आहे.

Protected Content