भाजपा वैद्यकीय आघाडीतर्फे रक्तदान व आरोग्य शिबीर

यावल,  प्रतिनिधी ।  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप  तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडीतर्फे  मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  या शिबिराचे आयोजन वैद्यकीय आघाडीचे पदधिकारी तथा नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांच्या वतीने आई हॉस्पिटल भुसावळ रोड यावल येथे केले होते. या शिबिराचे उदघाट्न माजी जलसंपदा मंत्री तथा आमदार  गिरीश महाजन , भाजपचे  जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे व रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे  यांच्या हस्ते भारत मातेच्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे  पूजन करून   करण्यात आले. याप्रसंगी आयोजित शिबीरात आई हॉस्पिटल यावल येथे डॉ. कुंदन फेगडे, डॉ. धिरज चौधरी, डॉ. प्रशांत जावळे, डॉ.पराग पाटील,  डॉ. प्रवीण पाटील यांनी  रुग्ण तपासणी व औषध वाटप केले.  या शिबिरामध्ये एकूण १२०० गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेत आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.  याप्रसंगी जळगाव जिल्हा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष श्रीकांतभाऊ महाजन, हिरकाका चौधरी, भाजपा रावेर -यावल विधानसभा सहक्षेत्र प्रमुख  विलास चौधरी, भाजपा जिल्हा  तालुकाध्यक्ष  उमेश फेगडे, रावेर तालुकाध्यक्ष राजेंद्र लासूरकर, यावल शहराध्यक्ष निलेश गडे, उपाध्यक्ष राहुल बारी,  यावल तालुक्याचे भाजपा वैद्यकिय आघाडीचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे,  फैजपूर  शहराध्यक्ष आनंद नेहेते,  नारायण बापु  चौधरी, युवा मोर्चा शहराध्यक्ष रितेश बारी,  सोशल मीडिया रावेर अध्यक्ष  मनोज धनगर,  अॅड.  गोविंद बारी प्रमोद नेमाडे,  सरचिटणीस परीस  नाईक, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस  व्यंकटेश  बारी, डॉ. धिरज चौधरी, डॉ. प्रशांत जावळे,  डॉ.पराग पाटील, डॉ. प्रवीण पाटील, भूषण फेगडे, संदीप भारंबे आदी उपस्थित होते.  रक्तदान  शिबिरासाठी जळगाव येथील माधवराव गोळवलकर रक्तपेढी याचे सहकार्य लाभले व या शिबिरात एकूण ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.  या शिबिरास  भारतीय जनता पार्टी,  डॉ. कुंदन दादा मित्र परिवार, डॉ. कुंदन फेगडे यांचे संपर्क प्रमुख सागर लोहार, मनोज बारी, विशाल बारी, लीलाधर काटे, आई हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.

 

Protected Content