अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली

राळेगणसिध्दी । ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची उपोषणाच्या दरम्यान प्रकृती बिघडली असून त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणार्‍या सरकारबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे महात्मा गांधी पुण्यतिथी म्हणजेच ३० जानेवारीपासून उपोषणास बसले आहेत. लोकपाल नियुक्ती, सर्व राज्यांमध्ये लोकायुक्तांची नेमणूक आणि स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी त्यांनी हे उपोषण सुरू केले आहे. अण्णांच्या बहुतांश मागण्या आधीच मान्य करण्यात आल्यामुळे त्यांनी उपोषण मागे घ्यावे अशी भूमिका सरकारने घेतली आहे. तथापि, मागण्या पूर्णपणे मान्य करण्यात यावा यावर अण्णा ठाम आहेत.

दरम्यान, आज अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस सुरू झाला असून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या यकृतावर परिणाम झाला असून उपोषण कायम राहिल्यास मूत्रपिंडांवर विपरीत परिणाम होण्याची भिती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, अण्णांची प्रकृती खालावल्यावरही सरकारने त्यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे राळेगणसिध्दी येथील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Add Comment

Protected Content