दहशतवादी हल्ल्याप्रकरणी सात जण ताब्यात

श्रीनगर वृत्तसंस्था । पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी जम्मू-काश्मिर पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

आत्मघाती दहशतवादी हल्ल्याप्रकरणी जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी आज सात जणांना ताब्यात घेतले आहे. दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभाग असल्याच्या संशयावरून या सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. संशयितांना पुलवामा आणि अवंतीपुरा या भागातून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या हल्ल्यात सुमारे ८० किलोग्रॅम आरडीएक्सचा वापर करण्यात आला. हे आरडीएक्स उच्चप्रतिचं होतं. हा आरडीएक्सचा साठा कारमध्ये भरून ही कार सीआरपीएफच्या बसला (बस क्रमांक- एचआर ४९ एफ ०६३७) धडकवण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. तर जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी कामरान हा पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार असल्याचेही तपासातून ज्ञात झाले आहे.

Add Comment

Protected Content