सुप्रीम कोर्टाकडून चिदंबरम यांना तूर्त दिलासा

Screenshot038 6 324x160

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | मीडिया घोटाळाप्रकरणी अंतरिम जामीन मिळावा, या माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांच्या विनंतीची दखल घेऊन त्यावर निर्णय द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला दिले आहेत. शिवाय कनिष्ठ न्यायालयाने जर चिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळला तर त्यांना तिहार तुरुंगात पाठवू नये, त्याऐवजी त्यांना घरी स्थानबद्ध करावे, असे आदेश देत सुप्रीम कोर्टाने चिदंबरम यांना तूर्त दिलासा दिला आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे की, चिदंबरम यांना तिहार तुरुंगात पाठवले जाणार नाही आणि जर ट्रायल कोर्टात त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला तर ते ५ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडीतच राहतील. सुनावणीच्या वेळी चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात सांगितले की, चिदंबरम ७४ वर्षांचे आहेत आणि त्यांना घरी स्थानबद्ध केले जाऊ शकते. यामुळे कोणाला काही समस्या नसावी.

सुप्रीम कोर्टाने सीबीआयला आदेश दिला आहे की, चिदंबरम यांच्याकडून अजामिनपात्र वॉरंटविरुद्ध दाखल याचिकेवर आपण आपले उत्तर द्या. चिदंबरम यांनी आपल्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट दाखल करणे आणि कोठडीत पाठवण्याच्या ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे.

Protected Content