भुसावळातील बियाणी स्कुलमध्ये बाप्पाचे जल्लोषात स्वागत (व्हिडीओ)

 

bhusaval

भुसावळ प्रतिनिधी । येथील बियाणी मिलीटरी स्कुलमधील इंग्रजी माध्यमाच्या सैनिकी शाळेत आज दि. 2 सप्टेंबर रोजी श्री गणरायाची स्थापना मोठ्या जल्लोषात करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रथम शाळेच्या झॉज लेझिम व बॅन्ड पथकाने श्री गणेशाची उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी झॉज लेझिम पथकाने ढोल ताशाच्या तालावर उत्कृष्ट नृत्य सादर केले. त्यानंतर शाळेचे अध्यक्ष मनोज बियाणी व सचिव संगिती बियाणी यांच्या हस्ते श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष मनोज बियाणी, सचिव संगीता बियाणी, राजीव पारिख, प्रा.डी.एम. पाटील व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व शाळेचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Protected Content