Home प्रशासन नगरपालिका  पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न ; नगराध्यक्ष सुनील काळे यांचे सबस्टेशनवर उपोषण सुरू

 पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न ; नगराध्यक्ष सुनील काळे यांचे सबस्टेशनवर उपोषण सुरू


वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी आज सकाळपासून ऑडनन्स फॅक्टरी परिसरातील विद्युत सबस्टेशनवर उपोषण सुरू केले आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हा आंदोलनात्मक मार्ग स्वीकारला आहे.

तापी नदीवरून वरणगाव शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, मागील चार ते पाच दिवसांपासून विद्युत पुरवठा कमी-जास्त दाबाने होत असल्याने पाणीपुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा विस्कळीत झाली आहे. वारंवार होणाऱ्या व्होल्टेज चढउतारांमुळे विद्युत पंप बंद पडत आहेत, परिणामी शहरातील जलपुरवठा ठप्प झाला आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून संताप व्यक्त केला जात आहे.

या गंभीर परिस्थितीमुळे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या सोबत अनेक कार्यकर्ते व स्थानिक नागरिकही सबस्टेशन परिसरात उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. वीजपुरवठा सुरळीत करून पाणीपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.


Protected Content

Play sound