मनोहर जोशी यांचे घर जाळण्यासाठी माणसे पाठवली; एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री असताना व्यासपिठावरून खाली उतरवले. त्यांचे घर जाळण्यासाठी माणसे पाठवली, तर रामदास कदम यांचा देखील कार्यक्रम करण्यासाठी ज्यांनी कटकारस्थान रचले, असा व्यक्ती नेता कसा असू शकतो, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. कोल्हापुरात शिवसेनेचे राज्यव्यापी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात शिंदे यांनी शनिवारी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. यावेळी त्यांनी पक्षातल्या कुरघोड्या चव्हाट्यावर आणल्या. आता याला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार, हे पाहावे लागेल. एकनाथ शिंदे म्हणाले की, काही लोकांना आयत्या पीठावर देखील नीट रेघोट्या मारता आल्या नाहीत. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांना भर व्यासपीठावरून खाली उतरवण्यात कोणाचे कारस्थान आहे. मनोहर जोशी यांचे घर जाळण्यासाठी माणसे पाठवण्यामागे कोणी कट रचला होता, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला.

एकनाथ शिंदे म्हणाले की, रामदास भाई कदम यांना देखील मी सांगितले होते की, तुम्ही शिवसेनेच्या कार्यक्रमासाठी षण्मुखानंद सभागृहात येऊ नका. कारण तुमचा देखील मनोहर पंत करण्याचा प्लॅन करण्यात आलेला आहे. हे सर्व गज्याभाऊ यांना देखील माहित आहे. गजानन कीर्तिकर यांना देखील अनेकदा माघारी पाठवले गेले. सुडाचे राजकारण केले जात होते, असा कोणी नेता असतो का? असा सवाल शिंदे यांनी करत ठाकरेंवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, एखादा कार्यकर्ता बोलायला लागला, चांगले भाषण करायला लागला तर त्याचे भाषण कट केले जात होते. गुलाबराव पाटील, रामदासभाई असे अनेक नावे आहेत. चांगले नेतृत्व व वक्तृत्व करत होते. पण त्यांना संपवण्याचे काम सुरू झाले होते.

एकनाथ शिंदे म्हणाले की, दोन चार टकल्यांना सोबत घेऊन पक्ष मोठा होत नाही. कुठली निवडणूक जिंकलो तर मला ठाकरे म्हणाले की, तुमच्यासाखरे तीन चार एकनाथ शिंदे पाहिजे. पण त्यांना प्रामाणिकपणे सांगितले एकना शिंदे नको तर त्या ताकदीचे कार्यकर्ते महाराष्ट्रात तयार केले पाहिजे, तेव्हाच पक्ष मोठा होईल. एकनाथ शिंदे म्हणाले की, शरद पवार म्हणाले तुम्ही मुख्यमंत्री व्हा, हे मला ते सांगत होते. तेव्हा रडवेला चेहरा होता. तेव्हा जाणवले यांना मोह झाला आहे. मी कधीच पदाला हापापलो नव्हतो. त्यांनी मला आधीच सांगितले असते, तर मी तसा माहोल तयार केला असता. ते दिसतात तसे इनोसंट नाहीत. त्यामागे अनेक चेहरे आहेत. एक चेहरे पे कई चेहरे लोग लगाते है लोग. माझा आवाज असा बंद करू नका. तसा तो बंद होणार नाही कारण माझ्या सोबत शिवसैनिक आहेत.

एकनाथ शिंदे म्हणाले की, लग्न एका सोबत, हनीमून एका सोबत असे त्यांनी केले आहे. हे मी संसदीय शब्द बोलतोय, मी कधीही असंसंदीय शब्द बोलत नाही. नीलम ताई सांगतील. मविआसोबत दिल्लीला गेले होते. मोदींना भेटायला. तेव्हा एकटेच गेले. केबिनमध्ये मोदींना भेटायला गेले आणि बाहेर आल्यावर घाम फुटला होता. दोन ग्लास पाणी प्यायले होते, हे मला अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी सांगितल्याचा दावाही त्यांनी केला. जय श्रीराम म्हणत एकनाथ शिंदे यांनी भाषणाची सुरुवात केली. लवकरच आपण सर्वांना अयोध्येला जायचे आहे. या महाअधिवेशनामुळे कोल्हापुरात भगवे वादळ आले आहे. शिवसैनिकांचे शक्तीपीठ या अधिवेशनाच्या निमित्ताने अवतरले आहे. अंबाबाईचे दर्शन घेऊनच बाळासाहेब सभेला सुरुवात करायचे आपणही तेच केले. बाळासाहेबांचे विचार आपण पुढे घेवुन जातोय म्हणून ही आज शिवसेना आहे. या अधिवेशनामुळे शिवसेना कुणाची आहे हे सांगण्याची आवश्यकता राहिली नाही. एकनाथ शिंदे डरपोक नाही, हा निधड्या छातीचा चेला असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, जेव्हा मी गडचिरोलीत काम करत होतो, तेव्हा पोलिस बोलले आपल्याला मायनिंगचे काम करता येणार नाही. मी बोललो नक्षलवाद मोठे की सरकार मोठे? कारखाना चालू केला. 10 हजार लोकांना रोजगार मिळाला. आणखी प्रोजेक्ट घेतले असून हजारो रोजगार मिळतील. मी कधीच कोणाला घाबरत नाही दाऊद आला शकील आला पण मी कोणाच्या धमकीचा घाबरत नाही. शिवसेनेचे हिंदूत्व व्यापक आहे. आता हिंदूहृदयसम्राट बोलायला तुमची जीभ का कचरते? काँग्रेसला लांब ठेवायला बाळासाहेब बोलले होते, पण यांनी तर काँग्रेसला मांडीवर घेवून बसले. शिवसेना वाचवण्यासाठी हे धाडस आम्ही केले. शिवसैनिकांचे खच्चीकरण होवू लागले, त्यामुळे आम्ही हे पाऊल उचलले. मी मनमोकळेपणाने सर्व सोडले असते. मी कधीही कोणते पद मागितलं नाही.

Protected Content