व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देण्यासाठी येणार स्वदेशी मॅसेजिग ॲप ‘संवाद’

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | व्हॉट्सअ‍ॅप हे सध्या जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. मात्र, भारतात आता व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देण्यासाठी थेट सरकारने स्वतःचं मेसेजिंग अ‍ॅप विकसित केलं आहे. या अ‍ॅपने नुकतीच सिक्युरिटी चाचणी पास केली आहे. ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्स’ने या अ‍ॅपची निर्मिती केली आहे.

संवाद अ‍ॅपने सिक्युरिटी टेस्ट क्लिअर केली आहे. हे अ‍ॅप अँड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर लाँच केलं जाऊ शकतं. या अ‍ॅपबद्दल खूप आधी घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर बराच काळ याबाबत कोणतीही अपडेट समोर आली नाही. त्यामुळे कित्येक लोक याबाबत विसरून देखील गेले होते. मात्र, आता याबाबत नवी माहिती समोर आली आहे.

टेस्ट पास झाल्याची माहिती डीआरडीओने आपल्या एक्स हँडलवरून दिली आहे. या अ‍ॅपला अद्याप लाँच करण्यात आलेलं नाही. मात्र, याचं वेब व्हर्जन अ‍ॅक्सेस करता येऊ शकतं. CDoT वेबसाईटवर जाऊन तुम्ही याचं वेब व्हर्जन वापरू शकता. केवळ ठराविक कंपनीच्या कर्मचाऱ्यांना याचा अ‍ॅक्सेस मिळणार आहे. आज तकने याबाबत माहिती दिली आहे.

CDoT वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, या प्लॅटफॉर्मवर वन-ऑन-वन एसएमएस, ग्रुप मेसेजिंग, कॉलिंग, स्टेटस ठेवणे, फोटो-व्हिडिओ किंवा डॉक्युमेंट्स शेअर करणे, लोकेशन, कॉन्टॅक्ट आणि इतर डीटेल्स शेअर करण्याचा पर्यायही यात मिळेल. एक्स्टर्नल अ‍ॅप्सवर मीडिया शेअरिंग, फिल्टर्ड न्यूज, ब्रॉडकास्ट लिस्ट असे कित्येक फीचर्स यामध्ये देण्यात येतील.

Protected Content