ज्येष्ठ पत्रकार भूपेंद्र मराठेंची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | २५ जून रोजी पाचोरा येथे शासकीय विश्राम गृहात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न झाली. यावेळी नूतन ग्रामीण कार्यकरणी जाहीर करण्यात आली. यावेळी नवीन सदस्यांना नियुक्ती पत्र देत सत्कार करून शुभेछा देण्यात आल्या.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक मा. संजय भोकरे, राज्य महासचिव मा. डॉ. विश्वास राव आरोटे, राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आली असून१)महेंद्र सूर्यवंशी. यांची जळगाव जिल्हा संघटक २)नंदकुमार शेलकर यांची जळगांव जिल्हा, उपाध्यक्ष पदी ३) (पारोळा )भूपेंद्र अनिल मराठे, जळगांव जिल्हा, उपाध्यक्ष,४) गफ्फार नजीर शेख,चाळीसगाव ता.अध्यक्ष ५) दीपक ललित जाम यांची चाळीसगाव ता. कार्याध्यक्ष ६) प्रवीण ब्राम्हणे यांची पाचोरा तालुका अध्यक्ष ७) राजेंद्र खैरनार यांची पाचोरा शहर अध्यक्ष ८)स्वप्नील कुमावत यांची पाचोरा शहर उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

या वेळी खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा खान्देश विभागीय कार्याध्यक्ष अबरार मिर्झा, खान्देश विभागीय उपाध्यक्ष भुवनेश दुसाने, खान्देश विभागीय संपर्काप्रमुख राकेश सुतार यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देत सत्कार करत निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील पत्रकार व सामाजिक हिताच्या कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

Protected Content