शेंदुर्णी उपनगराध्यक्षांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त पदासाठी उद्या निवड

शेंदुर्णी प्रतिनिधी | येथील नगरंचायतीच्या उप नगराध्यक्षा चंदाबाई अग्रवाल यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदासाठी उद्या निवडणूक होणार आहे. उद्या नामांकन अर्ज दाखल करता येणार असून अर्जांची छाननी होऊन लगेच निकाल घोषित येणार आहे.

येथील नगरंचायतीच्या नगराध्यक्षा चंदाबाई अग्रवाल यांनी पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्षा विजया खलसे यांचेकडे ५ जानेवारी २०२२ रोजी दिला होता. त्यांचा राजीनामा स्वीकृत करण्यात आला आहे.

रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदासाठी मा.जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून त्यानुसार जामनेर तालुका तहसिलदार हे पिठासिन निवडणूक अधिकारी राहणार आहेत. त्यांना मदतीसाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नगरपंचायत मुख्याधिकारी साजिद पिंजारी हे काम पाहतील.

उद्या दिनांक १३ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येईल. दुपारी १२ ते १२.३० दरम्यान आलेल्या अर्जांची छाननी करण्यात येईल. एकापेक्षा अधिक अर्ज दाखल झाल्यास १२.३० ते १२.४५ अर्ज मागे घेण्याची वेळ असेल आवश्यकता भासल्यास दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने निवडणूक घेण्यात येईल. व लगेच निकाल घोषित करण्यात येईल.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.