पाचोरा येथे सिनेट सदस्य विलास जोशी यांचा सत्कार

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नुकत्याच झालेल्या सिनेट निवडणुकीत निवडून आल्याबद्दल विलास जोशी यांचा येथे सत्कार करण्यात आला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या नुकत्याच झालेल्या सिनेट निवडणुकीत पाचोरा येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन विलास जोशी संस्थाचालक गटातील मतदारसंघात निवडून आले. त्याबद्दल त्यांचा सत्कार पाचोरा येथे सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामार्फत शहरातील हुतात्मा स्मारकात करण्यात आला.

यावेळी खलील देशमुख, ऍड. अविनाश भालेराव, सुनिल शिंदे, प्रा. गणेश पाटील, नंदकुमार सोनार, पप्पू राजपूत, संजय जडे, प्रताप पाटील, शशिकांत मोरे, निलेश कोटेचा, प्रा. मनीष बाविस्कर, शाहबाज बागवान उपस्थित होते. याप्रसंगी खलील देशमुख, अविनाश भालेराव, प्रा. गणेश पाटील, सुनील शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तावित व सूत्रसंचलन पप्पू राजपूत यांनी केले. तर उपस्थितांचे आभार संजय जडे यांनी मानले.

Protected Content

%d bloggers like this: