शिवाजी विद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणावर चर्चासत्र

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्ष तर्फे शिवाजी विद्यालय, कूऱ्हा येथे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याविषयावर चर्चासत्राचे आयोजन २४ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आले.
चर्चासत्राचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.बी.पाटील होते. प्रमुख अतिथी व मार्गदर्शक डॉ. जी . एस. चव्हाण, तर चर्चासत्राचे प्रास्ताविक प्रा. डॉ पी. एस. प्रेमसागर, गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती रवींद्र पाटील सर व काकडे सर होते.

प्रमुख मार्गदर्शक डॉ. जी . एस. चव्हाण यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याविषयावर सविस्तर माहिती दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे केंद्र सरकारने स्विकारले असून ते येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी म्हणजेच २०२४-२५ पासून महाविद्यालयांना लागू करण्यात येणार आहे. त्यासाठीचा अभ्यासक्रम देखील तयार झालेला आहे. यापूर्वी दहावी, बारावी व तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असायचा. आताच्या शैक्षणिक धोरणात अगदी के.जी.पासून तर पी.जी.पर्यंतचा विचार केलेला आहे. आता विद्यार्थी तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून पदविका व चार वर्षांत पदवी प्राप्त करतील त्यासह ऑनर्स व पदवी प्राप्तसह भविष्यात संशोधन करण्यास चालना व मदत होईल.

विद्यार्थ्यांना आता क्रेडिट गोळा करावे लागतील व ते क्रेडिट विद्यार्थ्यांच्या अकादमिक बँक ऑफ क्रेडिट मध्ये जमा होतील. त्याला अभ्यासासह इतर उपक्रम, इंटर्नशिप, प्रकल्प देखील पूर्ण करावे लागतील. एक विषय मेजर घेऊन दुसरा विषय मायनर म्हणून घेता येईल तसेच कला शाखेतील विद्यार्थी कौशल्यावर आधारित एक विषय कोणत्याही शाखेचा वरीलपैकी कोणत्याही शाखेतून निवड करुन अभ्यासू शकेल. अध्यक्षीय मार्गदर्शनात अध्यक्षस्थानी मुख्यापक श्री. एस.बी.पाटील यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होत असल्याने जे विद्यार्थी आता बारावी वर्गात शिकत आहेत. पुढील वर्षी प्रथम वर्ष कला विभागात प्रवेश घेतील व सध्या पदवीसाठी प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच उपस्थित पालक यांनी देखील वरील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समजून घेणे गरजेचे व आवश्यक आहे,म्हणून पालकांचा सहभाग देखील महत्त्वाचा असल्याचे केले. सूत्रसंचालन सूत्रसंचालन श्री धुंदले सरानी केले.

Protected Content