शेंदुर्णीच्या गरुड महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वेबिनारचे आयोजन

शेंदुर्णी ता.जामनेर (प्रतिनिधी) । येथील अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात “Consumer Guidance and Financial Literacy” उपभोक्तावाद आणि बँकिंग साक्षरता या विषयावर गरुड कॉलेज शेंदुर्णी आणि ग्राहक मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्य मुंबई Consumer Guidance Society of India यांच्या संयुक्त विद्यमानाने वाणिज्य विभागाअंतर्गत एकदिवशीय वेबिनार चे आयोजन दिनांक 15 सप्टेंबर 2020 मंगळवार रोजी करण्यात आले.

सदर ऑनलाइन बेबीनार चा विषय होता उपभोक्ता वाद आणि बँकिंग साक्षरता in covid-19. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने सदर वेबिनार चे आयोजन विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी महाविद्यालयामार्फत करण्यात आले सदर वेबिनारच्या उद्घाटन भाषणामध्ये उपप्राचार्य डॉ. श्याम साळुंखे यांनी वेबिनार आयोजनामागची भूमिका विशद केली सदर वेबिनारच्या समन्वयिका डॉ. सुजाता पाटील यांनी वेबिनार आयोजनाचा उद्देश तसेच महाविद्यालयाची पार्श्वभूमी विशद केली.

वेबिनारच्या प्रथम भागात अर्चना भिंगार्डे Finance Speaker यांनी वित्तीय तरतुदी ,आर्थिक नियोजन व व्यवस्थापन याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले तसेच द्वितीय सत्रात डॉ.मनोहर कामत यांनी उपभोक्तावाद याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करताना सांगितले की उपभोक्त्याने जागरुक असले पाहिजे ग्राहकांनी आपले हक्क तसेच जबाबदाऱ्या सुद्धा लक्षात घ्यावयास हव्यात हे अनेक उदाहरणांच्या माध्यमातून विश्लेषण केले सूत्रसंचालन व संयोजन डॉ.सुजाता पाटील यांनी केले तर आभार प्रा. डॉ.योगिता चौधरी यांनी मानले.

सदर वेबिनारला मोठ्या संख्येने विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते उपप्राचार्य डॉक्टर संजय भोळे , प्राध्यापक अमर जावळे डॉक्टर आर डी गवारे , डॉक्टर महेश पाटील डॉक्टर ए एन जिवरग डॉक्टर वसंत पतंगे प्राध्यापक धम्म धारगावे प्राध्यापक एस जी देहरकर प्राध्यापक आप्पा महाजन प्राध्यापक प्रमोद सोनवणे डॉक्टर राजकुवर गजरे प्राध्यापक वर्षा लोखंडे प्राध्यापक रीना गरुड प्राध्यापक छाया पाटील आदी उपस्थित होते.

सदर वेबिनार साठी संस्थेचे अध्यक्ष मा. संजयराव गरुड कार्याध्यक्ष श्री सतिशराव काशिद , सचिव सागरमल जैन , सहसचिव दीपक गरुड संचालक यु यु पाटील महिला संचालक सौ उज्वलाताई काशीद , प्राचार्य डॉक्टर वासुदेव पाटील यांनी शुभेच्छा दिल्यात.

Protected Content