मंत्रप्रयोग करणार्‍या दोन मांत्रिकांना रंगेहात पकडले

ठाणे वृत्तसंस्था । एकनाथ शिंदे यांचा फोटो तांदळामध्ये ठेवून मंत्रप्रयोग करणार्‍या दोन मांत्रिकांना पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातून रंगेहात अटक केली आहे.

कर्‍हे तलावली येथील एका घरात पालकमंत्री शिंदे यांच्या फोटोसमोर अगरबत्ती लावून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू, पांढरा कोंबडा ठेवण्यात आला होता. यावेळी मांत्रिक मंत्रोच्चार करून जादूटोणा करत असतानाच पोलिसांनी दोन आरोपींना रंगेहाथ पकडले. पालघरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कृष्णा बाळू कुरकुटे व संतोष मगरू वारडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदे यांचा फोटो लावण्यामागील उद्देश काय आहे? याचा तपास पोलीस यंत्रणा करीत आहे. स्वर्गात स्थान मिळवण्यासाठी शहापूर तालुक्यातील जंगलामध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास लावून घेतल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता.

Protected Content