विद्यापीठात मोडी लिपी कार्यशाळेचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे प्रशाळेत 16 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालय विभागामार्फत ‘एकदिवसीय मोडी लिपी प्रशिक्षण कार्यशाळेचे ‘ आयोजन करण्यात आलेले आहे. शासनाचे पुरातन विभागाचे तज्ञ मार्गदर्शक यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.

सदर कार्यशाळा विद्यार्थी/प्राध्यापक/संशोधक/ शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपयुक्त अशी राहणार आहे. सदर प्रशिक्षणासाठी नोंदणी शुल्क फक्त 200 इतकेच आकारण्यात येणार आहे तरी इच्छुकांनी डॉ. मनोज इंगोले भ्रमणध्वनी 96237758 व कृणाल महाजन भ्रमणध्वनी 7397984672 यांच्याशी सम्पर्क करावा असे आवाहन विद्यापीठातील सामाजिक शास्त्र प्रशाळेचे संचालक डॉ. अजय पाटील यांनी केले आहे.

Protected Content