आशा पाटील हिची विद्यापीठ संघात निवड

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयाची विद्यार्थिनी आशा कैलास पाटील (एफवायबीसीए )या खेळाडूची क. ब .चौ. उ. म. विद्यापीठ जळगाव  योग स्पर्धा संघात निवड झाली.

 

के. आय.आय. टी. विद्यापीठ भुवनेश्वर (ओडिसा ) या ठिकाणी दि.२६ ते २९  डिसेंबर २०२२ या दरम्यान आयोजित योग स्पर्धेत विद्यापीठाच्या संघात आशा पाटील हिची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेकरिता हा संघ आज दि. २४ डिसेंबर २०२२  रोजी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना झाला. आशा  पाटील या विद्यार्थिनीला प्रा. डॉ. प्रतिभा ढाके (क्रीडा संचालक )यांचे मार्गदर्शन लाभले.  तिच्या या यशाबद्दल मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे -खेवलकर, उपाध्यक्ष नारायण चौधरी, सचिव  डॉ. सी. एस. चौधरी, प्राचार्य डॉ. हेमंत महाजन, उप प्राचार्य डॉ.  ए .पी. पाटील सर्व प्राध्यापक वृंदा शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्यात.

 

Protected Content