आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी रविवारी निवड चाचणी

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा क्रिकेट संघाची निवड करण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन रविवार दि. १६ ऑक्टोबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आली   आहे.

 

आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणीस  रविवार दि. १६ ऑक्टोबर रोजी  सकाळी ८ वाजेपासून प्रारंभ करण्यात येणार आहे. या निवड चाचणीसाठी केवळ ०१/०९/२००८ रोजी वा त्यानंतर जन्म झालेलेच खेळाडू पात्र असतील.पात्र व इच्छुक खेळाडूंनी आपले ऑनलाईन फॉर्म या  https://forms.gle/t1MzSwchBqUxzNVi9 संकेस्थळावर भरून द्यावे व आधार कार्ड व जन्म तारखेचा मूळ दाखला (केवळ ग्रामपंचयती/नगरपरिषद/नगरपालिका/महानगरपालिका यांनी दिलेला जन्मदाखला) झेरॉक्स व ओरिजनल कॉपी घेऊन निवड चाचणीसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या क्रिकेट मैदानावर  डी मार्ट जवळ विद्या शाळाचे मागे महेरूण येथे क्रिकेटच्या पांढरा गणवेश, बूट, व आपल्या क्रिकेट किट व १०० रुपये निवड चाचणी फीसह उपस्थित रहावे असे जळगाव जिल्हा क्रिकेट अससिएशनचे अध्यक्ष  अतुल जैन यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी असोसिशनचे सचिव  श्री अरविंद देशपांडे ( मो.९४०४९५५२०५ )श्री अविनाश लाठी  (मो.९८२२६ १६५०३) यांचेशी संपर्क साधावा

 

Protected Content