भाजप शहराध्यक्षाने उचलले टोकाचे पाऊल : परिसर हादरला

बीड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । बीड शहरातील भाजपाचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरी स्वत:जवळील बंदुकीने डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

 

भगिरथ बियाणी हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या सर्व राजकीय कामाची जबाबदारी भगीरथ बियाणी यांच्याकडे होती. त्यांच्या विश्वासू समर्थकांपैकी एक ते होते. सोमवारी १० ऑक्टोबर रोजी रात्री आपल्या कुटूंबासमवेत रात्री उशिरापर्यंत त्यांनी गप्पा मारल्या. नंतर ते आपल्या खोलीत जावून झोपले. सकाळी उशीरापर्यंत दरवाजा न उघडल्याने कुटुंबियांनी धाव घेतली. आत जावून पाहिले तर बियाणी हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना तात्काळ बीड शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, घटनेची माहिती समजताच खा.प्रीतम मुंडे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांच्यासह शेकडो, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रूग्णालयाकडे धाव घेतली.

 

Protected Content