अखेर दुचाकी चोरटा भुसावळ पोलीसांच्या ताब्यात

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील सुहास नगरातून ३० ऑक्टोंबर रोजी दुचाकी अज्ञान चोरट्यांनी लंपास केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील २ आरोपींना जळगाव येथून अटक करण्यात आली असून आरोपीच्या ताब्यातील दुचाकी जप्त करण्यात आली आहे. 

भुसावळ बाजार पेठ पो स्टेशन भाग5 गुरन 0920/2020 भादवी कलम 379 प्रमाणे दिनांक 30/10/2020 रोजी 13.58 वा. गुन्हा दाखल असुन यातील फिर्यादी नामे नामदेव प्रकाश गायकवाड रा.सुहास नगर भुसावळ यांची मो.सा. MH19AY 4604 होन्डा स्प्लेंडर कंपनीची दि.27/10/2020 रोजी रात्री चोरी ला गेली होती. तरी सदर गुन्ह्यात 2 आरोपी अटक करुन त्यांच्याकडून सदरची मोटारसायकल ही हस्तगत करण्यात आली आहे.  सदर गुन्ह्यातील तिसरा आरोपी नामे कलीम उर्फ बाबा करीम पटेल वय 23 रा.MIDC सुप्रीम कॉलनी जळगाव हा सदर गुन्ह्या घडल्या पासुन फरार होता. 

पोलीस उपविभागीय अधिकारी श्री सोमनाथ वाघचौरे सर सो यांना मिळाल्या गुप्त बातमी वरुन त्यास आज रोजी दिनांक 28/12/2020 रोजी  जळगाव शहरातील MIDC सुप्रीम कॉलनी भागातुन MIDC पोलीस स्टेशन च्या पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने त्यास ताब्यात घेवुन पो.स्टे.ला आणुन अटक करण्यात आली आहे. 

सदरची कार्यवाहीपोलीस अधीक्षक डाॅ.प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, चाळीसगाव परीमंडळ, पो.उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे सर सो, पोलीस निरीक्षकदिलीप भागवत सर सो मा.पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबरे  यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.रमण सुरळकर, उमाकांत पाटील पो.काॅ. विकास सातदिवे कृष्णा देशमुख ,ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी तसेच MIDC पो स्टे चे सहा फौज.आनंदसिग पाटील अश्या नी केली असुन पुढील तपास पो.ना.रमण सुरळकर करीत आहेत.

Protected Content