जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणीसाठी यावल तालुक्यातील दोन केद्रांची निवड

यावल प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणीची परिक्षा दि.११ ऑगस्ट रोजी होत असुन यासाठी यावल तालुक्यातील दोन केद्रांची निवड करण्यात आली असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सुत्रांकडुन मिळाली आहे. 

यावल तालुक्यातील इत्तया सहावी वर्गातील ६६०विद्यार्थांची यावल येथील डॉ झाकीर हुसैन उर्दु हायस्कुल व साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल या दोन केन्द्रांची परिक्षा केन्द्रासाठी निवड करण्यात आली आहे. या संदर्भात जवाहर नयोदय विद्यालयाचे प्राचार्य आर. आर . खंडारे यांनी जळगाव जिल्ह्यातील निवड करण्यात आलेल्या परिक्षा केन्द्राबाबतची माहिती तालुकानिहाय गटशिक्षण अधिकारी यांच्या माध्यमातुन ५१ शाळांना (दि. २२) रोजी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. जळगाव जिल्ह्यातील ३१ विविध शाळा व महाविद्यालयांवर दि. ११ ऑगस्ट २१ रोजी सकाळी ११ , ३०ते १,३० वाजेपर्यंत परिक्षा वेळ असुन याकरीता जळगाव जिल्ह्यातील इत्तया सहावीच्या ११ हजार ७९० विद्यार्थांची हे ३१ गटनिहाय निवड झालेल्या परिक्षा केन्द्रांवर जवाहर नवोदय विद्यालय चाचणी परिक्षा आयोजीत करण्यात आल्या आहेत.

सदर परिक्षापुर्व तयारीसाठी कोवीड१९च्या सर्व नियमावलीनुसार परिक्षेची पुर्ण तयारी करणे हेतु सर्व तालुकानिहाय गट शिक्षण अधिकारी यांच्या माध्यमातुन परिक्षा केन्द्रावर केन्द्र प्रमुखांनी योग्यस्तरावर परिक्षा केन्द्रांची तपासणी करणे बैठक व्यवस्था, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आदी विषयांचे शिघ्र निर्देश देण्यात आले.

केन्द्र प्रमुख आणी पर्यवेक्षकांना देण्यात आले आहेत . या संदर्भातील निर्देशीत केलेल्या सुचना त्या त्या शाळांच्या समग्र मुख्यध्यापकांनी व विद्यार्थी पालकवर्गाला द्याव्यात असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर आर खंडारे यांनी पत्राद्वारे सुचित केले आहे.

११ ऑगस्ट रोजी होणाऱ्या चाचणी परिक्षेसाठी निवड करण्यात आलेली केन्द्र पुढीलप्रमाणे ए टी झांबरे व लना हायस्कुल जळगाव, नंदीनीबाई वामन मुलींचे विकास विद्यालय जळगाव, पंकज एम विद्यालय व विवेकानंद विद्यालय चोपडा, साने गुरूजी हायस्कुल व डॉ. जाकीर हुसेन विद्यालय यावल, सरदार जी.जी. हायस्कुल व कमलाबाई गर्ल्स हायस्कुल रावेर, जे.ई. हायस्कुल व टी एल कोळंबे स्कुल, मुक्ताईनगर, के. नारखेडे विद्यालय व तापी इंग्लीश स्कुल भुसावळ, न्यु इंग्लीश स्कुल व इंदीरा ललवानी हायस्कुल आणी एकलव्य प्रायमरी जामनेर. , जी एस हायस्कुल व एम एम कॉलेज पाचोरा, राष्ट्रीय विद्यालय नेहरू व ए.बी बॉयस हायस्कुल आणी काकासाहेब पुनरपते विद्यालय चाळीसगाव, सुमाताई गिरधर माध्यमिक विद्यालय वलडकुबाई माध्यमीक विद्यालय भडगाव, एन ई एस बॉयस हायस्कुल व डॉ व्ही एम जैन माध्यमीक विद्यालय पारोळा, आर टी काबरे हायस्कुल व जिजामाता माध्यमीक विद्यालय एरंडोल, जी एस हायस्कूल व साने गुरूजी विद्यालय अमळनेर, एन एच राका हायस्कुल बोदवड आणी धरणगावच्या इंदीरा गांधी सेकेंडरी हायस्कुल यांचा परिक्षा केन्द्रासाठी समावेश करण्यात आले आहे.

 

Protected Content