अजित पवारांच्या यंदाच्या वाढदिवशी १३ व्या हँडबुकचे प्रकाशन

 

मुंबई : प्रतिनिधी । राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या यंदाच्या वाढदिवसानिमित्त  १३ व्या हँडबुकचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले

 

गेल्या १३ वर्षांपासून हा हँडबुक निर्मितीचा उपक्रम जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राबवत आहेत . एका अर्थाने अजितदादा पवार यांच्या राजकीय वाटचालीतील घडामोडींचा मागोवा घेणारा हा महत्वाचा

दस्तऐवज ठरणार आहे , अशी या उपक्रमाची प्रशंसा केली जाते . त्या त्या परिस्थितीतील अजितदादा पवारांची भूमिका आणि वाटचालीची नोंद अधोरेखित करताना त्या विशिष्ट परिस्थिती आणि मुद्द्यांचीही नोंद होत असल्याने भविष्यात या हँडबुकमधील संदर्भ महत्वाचे ठरणार आहेत पक्षाच्या वाटचालीचाही मागोवा आपसूकच घेतला गेला असल्याने  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटचालीलाही हे संदर्भ उपयुक्त ठरणार आहेत

 

उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या यंदाच्या वाढदिवसानिमित्त सलग 13 व्या वर्षी राष्ट्रवादीचे हँडबुकचे प्रकाशन   राज्याचे गृहमंत्री ना.दिलिप वळसे-पाटील यांच्या हस्ते आणि  प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री  ना जयंत पाटिल, आरोग्यमंत्री ना राजेश  टोपे  यांच्या समवेत हँडबुकचे  प्रकाशक संजुभाऊ चव्हाण, दिलिप पाटिल, अजय  बढे व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले .

Protected Content