खामगाव येथील दुरदर्शन केंद्र होणार २३ ऑगस्टपासून बंद

खामगाव प्रतिनिधी । अकोला अधिनस्त असलेल्या खामगाव येथील दुरदर्शन केंद्राची प्रसारण सेवा येत्या २३ ऑगस्ट पासून बंद होणार आहे. अशा आदेशाचे पत्र १३ जुलै रोजी दुरदर्शन केंद्र महानिर्देशालयाच्या वतीने खामगाव लघुप्रक्षेपण केंद्राला पाठविण्यात आले आहे. 

खामगाव दुरदर्शन केंद्राच्या माध्यमातून चॅनल क्र. २१ द्वारे प्रसारण करण्यात येत होते. ही सेवा २३ ऑगस्ट २०२१ रोजी मध्यरात्रीपासून बंद करण्यात येणार आहे. दुरदर्शन प्रसारण टेरिस्टेरियलच्या माध्यमातून उपलब्ध न होता डी.डी. फ्री डिश डी. टी. एच. सव्हींस या माध्यमातून सत्यम् शिवम् सुन्दरम् उपलब्ध होणार आहे. यासाठी सेटअॅप बॉक्स, डिश, अँटेना आदी साधनांचा वापर करावा लागणार आहे, अशी माहिती दुरदर्शन अनभरण केंद्र अकोलाचे सहाय्यक अभियंता एस. एस. राऊत यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. डिजीटल युगात प्रसारण सेवेत नवनवे तंत्रज्ञान विकसीत होत आहे. त्यामुळे जुने तंत्रज्ञान कालबाह्य होत आहे. त्यातून जुन्यासेवा बंद होत असून नव्या सेवा सुरु होत आहेत.

 

Protected Content