पुण्यात मध्यरात्री संभाजी महाराजांचा पुतळा बसविला

पुणे प्रतिनिधी । येथील संभाजी उद्यानात मध्यरात्री स्वाभीमान संघटनेने छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला असून यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

याबाबत वृत्तांत असा की, पुण्यातील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांच्या ऐवजी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्याची मागणी करण्यात येत आहे. दोन वर्षांपूर्वी गणकरींचा पुतळा हलविण्यात आला असून यावरून वाददेखील झाले आहेत. या पार्श्‍वभूमिवर, काल मध्यरात्रीच्या सुमारास
स्वाभिमान संघटनेचा गणेश कारले या तरुणाने उद्यानात संभाजी महाराजांचा पुतळा बसवला. या प्रकारामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली. उद्यानात पुतळा बसवल्यानंतर गणेश कारले याने पुतळ्याच्या खालील बाजूस एक भित्तिपत्रक लावले होते. त्यात असे म्हटले आहे की, छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा जर कोणी काढला किंवा तसा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटेल आणि उद्रेक होईल. मात्र पोलिसांनी हा पुतळा हटविला असून यामुळे आता वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

Add Comment

Protected Content