छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची पूजा होणे आवश्यक : मुख्याध्यापक अनिल महाजन

अमळनेर (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विरोधक नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिमखान त्याच्या वडिलांचे नाव काझी हैदर विजापूरच्या राजाची साठ सोडून पाचशे पठाण शिवरायांच्या सैन्यात सामील झाले होते.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सर्व जाती-धर्माच्या लोकांचा भरणा होता. सैन्याला आदेश देऊन सर्वसामान्यांचे म्हणजे जनतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवराय समाजाला समजणे आवश्यक आहे .त्यांच्या विचारांची पूजा घरोघरी होणे आवश्यक आहे, असे देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये शिवजयंती निमित्त अध्यक्षीय भाषणावरून शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन बोलत होते. या वेळी व्यासपीठावर शाळेचे शिक्षक,आय.आर.महाजन, एस के महाजन ,एच.ओ.माळी होते.


शाळेचे स्काऊट शिक्षक एच.ओ.माळी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आय .आर. महाजन यांनी केले. शाळेचे शिक्षक एच.ओ.माळी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे रूपांतर सुराज्यामध्ये केले. त्यांचा इतिहास समजून घ्यायचा असेल तरी ह्या महामानवांना डोक्यावर घेतल्याने समजत नाहीत. तर हे महामानव डोक्यात घ्यावे लागतात .ज्या दिवशी महामानवांना बहुजन समाज डोक्यात घेऊन चालण्यास सुरुवात करेल तेव्हा आपले निश्चितच भले होईल .यासाठी जयंती दिवशी विविध स्पर्धा गुणवंतांचा सत्कार ,चर्चासत्रे ,परिसंवाद ,व्याख्याने, प्रवचने ,पुस्तके सप्रेम भेट देणे अशा प्रथा सुरू होणे आवश्यक आहेत. कारण माणसाच्या घरात पुस्तक आले की मस्तक सशक्त होते ,सशक्त झालेले मस्तक कोणाचे हस्तक होत नसते. कुणाचे हस्तक न झालेले मस्तक कोठे नतमस्तक होत नसते. पुस्तके वाचा इतरांना वाचण्याचा आग्रह करा. महामानवाच्या विचाराचे आचरण करा तर खर्‍या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी केल्याचे समाधान वाटेल,असेही ते म्हणाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी संभाजी पाटील यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे आभार एस के महाजन यांनी मानले.

Add Comment

Protected Content