घरफोडीतील गुन्हेगाराला अटक; चोरीचे दागिने हस्तगत

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील ताडेपुरा भागात बंद घरातून ७ लाख ९४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड असा ऐवज लांबविण्याऱ्या संशयित आरोपीला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचे दागिने हस्तगत केले आहे.

 

अमळनेर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव रोडवरील ताडेपुरा भागात राहणाऱ्या रेखा अनिल लांडगे (वय-४०) यांच्या बंद घरातून २९ जुलै २०२१ रोजी रात्री अज्ञात चोरट्या ७ लाख ९४ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोकड असा ऐवज लांबविला होता. याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या गुन्ह्यातील संशयित आरोपी निलेश विनोद माढरे याने चोरी केल्याचे गोपनीय माहिती अमळनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार पोलीसाच्या पथकाने संशयित आरोपीला ८ एप्रिल रोजी अमळनेर शहरातून राहत्या घरातून अटक केली आहे. त्याला १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान त्याने चोरी केलेले सोन्याचे दागिने हे पत्नी प्रियंका निलेश माढरे व  व आई शीतल विनोद माढरे यांच्या मदतीने सोनाराकडे विक्री करून नव्याने दागिने केले होते. त्याचप्रमाणे यातील काही दागिने सुरत येथील वडनेरा येथील सराफा दुकानावर विक्री केले होते. याची कबुली दिली. पोलीसांनी संबंधित दागिने सोनाराकडून हस्तगत केले आहे तर या चोरीच्या गुन्ह्यात मदत करणारे संशयित आरोपीची आई शितल विनोद माछरे व पत्नी प्रियंका निलेश माछरे यांना देखील अटक करण्यात आली आहे. तिघांना १२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

हे कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल अहिरे, पोहेकॉ किशोर पाटील, मिलिंद भामरे, सूर्यकांत साळुंके, सिद्धार्थ शिसोदे यांनी केली आहे.

 

Protected Content