दहिगाव येथील शेतकऱ्याची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दहीगाव येथील ४४ वर्षीय शेतकऱ्याने शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

योगेश देविदास महाजन (वय-४४) रा. दहिगाव ता. यावल असे मयत शेतकऱ्यांचे नाव आहे. सविस्तर माहिती अशी की, योगेश महाजन हे मुलगी डिंपल आणि मुलगा उमेश यांच्यासह दहीगाव ता. यावल येथे राहतो. त्याचठिकाणी त्यांचे मोठे भाऊ भानुदास देविदास महाजन हे राहतात. तीन वर्षांपुर्वी योगेश महाजन यांची पत्नी अनिताचे निधन झाले आहे. आज शुक्रवार ८ ऑक्टोबर रोजी सकाळी योगेश महाजन हे शेतात कामाला निघुन गेले. व शेतात जावून विषारी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. हा प्रकार त्यांच्या शेतातील शेजारी शेतकरी निंबादास रेवा महाजन यांचा लक्षात आली. त्यांनी तातडीन भानुदास महाजन यांना फोनद्वारे कळविले. यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिडके यांनी मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी भानुदास महाजन यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस हॅड कॉस्टेबल सिकंदर तडवी हे करीत आहे .

Protected Content