वॉर रूमसंबंधित मोबाईल नंबर जाहीर

 

जळगाव, प्रतिनिधी   । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वॉर रूम, खाटा प्रवेश व्यवस्थापन समिती, मृत्यू समन्वय समिती नेमण्यात आली आहे. त्याचे कामकाज मंगळवारी २३ मार्च रोजी सुरु झाले आहे. त्याबाबतचे मोबाईल नम्बर जाहीर करण्यात आले आहे. 

यात वॉर रूमचा नम्बर ८७६७१९९४७६ हा असून येथे नागरिक त्यांचे शंका तसेच, नातेवाईक त्यांच्या रुग्णांच्या प्रकृतीविषयी माहिती विचारू शकतात. नागरिकांशी संवाद साधणे, त्यांना माहिती देणे हे काम वॉर रूमचे आहे. तर खाटा प्रवेश व्यवस्थापन समितीचा नम्बर ९३५६९४४३१४असा असून येथे शासकीय रुग्णालयात खाटा  उपलब्ध आहे काय याची माहिती दिली जाणार आहे. तर मृत्यू समन्वय समिती जर एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याबाबतची पुढील कार्यवाही करण्याचे काम हि समिती करणार आहे. या समितीचा नम्बर ८७६७३२४१३३ असा आहे.  नागरिकांनी संबंधित सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले आहे.

दरम्यान, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी कोरोना महामारीच्या आजारावर मात करून पुन्हा अधिष्ठातापदावर  रुजू झाले आहेत. सकाळीच त्यांनी पूर्ण रुग्णालयाचा राउंड घेऊन परिस्थिती जाणून घेतली. डॉ. रामानंद हे १० मार्च रोजी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. तब्बल १३ दिवस उपचार घेतल्यानंतर ते उपचारातून बरे होऊन मंगळवारी २३ रोजी कर्तव्यावर रुजू झाले. सकाळी १० वाजता सर्व विभागात जाऊन त्यांनी स्थिती जाणून घेतली. डॉक्टर्स व परिचारिका, कक्षसेवक आदी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून विविध सूचना अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी केल्या. रुग्णांशी देखील संवाद साधत त्यांनी धीर दिला. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यानंतर दिवसभर त्यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठक व इतर दैनंदिन कामकाजात सहभाग घेतला.

 

Protected Content