जिल्हा गणतंत्र दिवस परेडमध्ये थीम महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची निवड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नवी दिल्ली येथील कर्तव्यपथावर दरवर्षी गणतंत्र परेड होते त्याच स्वरूपातील गणतंत्र परेड जळगाव जिल्हा पोलीस मैदानावर दरवर्षी आयोजित करण्यात येते. सदर गणतंत्र परेडमध्ये पोलीस, शाळांचे विद्यार्थी, स्काऊटचे विद्यार्थी, एनसीसी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा पथक मार्च करतो.

यावर्षी राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकामध्ये इकरा एच. जे. थीम हाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या  तन्वीर पटवे, नोमान बागवान आणि काशिफ़ पिंजारी यांची निवड करण्यात आली. परेडमध्ये उत्कृष्ट मार्च केल्यामुळे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर चांदखान, उपप्राचार्य डॉक्टर वकार शेख, उपप्राचार्य डॉक्टर तन्वीर खान, ( कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना ) डॉक्टर हाफिज शेख सहाय्यक कार्यक्रमाधिकारी आणि डॉक्टर राजू गवरे, जळगाव विभागीय समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Protected Content