वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून नवीन प्रकल्प आणण्याचा प्रयत्न- मंत्री संजय सावकारे

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळच्या एमआयडीसीतील उद्योगांना चालना मिळण्यासाठी आमदार असतांना रस्ते, पाण्याची सुविधा आणि सबस्टेशनची निर्मीती करण्यात आली. आगामी काळात केळी खोडापासून धागा तयार करण्याचे युनीट तयार झाले असून आगामी काळात वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून अजून काही नवीन प्रकल्प आणण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या ‘एक रेशन कार्ड एक साडी’ या योजनेअंतर्गत अंत्योदय शिधापत्रिका धारकांना वस्त्रोद्योग विभागाकडून यंत्र मागावर विणलेल्या साड्याचे वितरण वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री संजय सावकारे यांनी बोलताना सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या ‘एक रेशन कार्ड एक साडी’ या उपक्रमांतर्गत यंदाचा वितरण सोहळा भुसावळ शहरातून सुरुवात करण्यात आली आहे. पुढील काळात राज्यभरात या योजनेअंतर्गत महिलांना मोफत साड्यांचे वितरण करण्यात येणार आहेत. दरम्यान अंत्योदय शिधापत्रिका धारकांच्या बऱ्यापैकी समस्या सोडवण्यात आलेल्या आहेत. पुढे त्यांनी एमआयडीसी बद्दल बोलताना सांगितले की, मी आमदार होण्यापूर्वी भुसावळ एमआयडीसीमध्ये अनेक समस्या होत्या. आमदार झाल्यानंतर एमआयडीसीत अधिक लहान, मोठे उद्योग सुरू झाले. तसेच एमआयडीसीतील कंपन्यांसाठी रस्ते पाण्याची सुविधा आणि सबस्टेशनची निर्मिती करण्यात आली जेणेकरून उद्योगाला चालना मिळेल असे सांगितले.

Protected Content