वैज्ञानिक अधिकारीपदी निवड; मंत्री अनिल पाटील यांनी केला सत्कार

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमपीएसी स्पर्धा परिक्षेत वर्ग तीन मधील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मलेरीयापदी रिना माळी यांची निवड झाल्याने मंत्री अनिल पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर तिच्या यशाचे कौतूक करण्यात आले.

रिना माळी स्पर्धा परीक्षेत सरळ सेवा अंतर्गत डिसेंबर २०२३ मध्ये ह्या पोस्टची परीक्षा तिने दिली होती. यात तीला यश मिळाले असून तिची प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मलेरिया म्हणून चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात निवड झाली आहे. मंत्री अनिल पाटील यांनी तिच्या घरी जावून सत्कार केला. यावेळी मंत्री अनिल पाटील यांचे स्वीय सहाय्यक एल.टी. पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, उपसरपंच पिंटू राजपूत, माजी ग्रामपंचायत सदस्य आबा महाजन, अशोक चौधरी, भूषण पाटील, दिनेश राजपूत, सचिन बेहरे, बाबुलाल पाटील, देविदास माळी, मधुकर माळी, डॉ. कपिल महाजन, बाळासाहेब शिसोदे, स्वप्नील माळी आदी उपस्थित होते.

Protected Content