जवखेडे येथील तलाठ्यास १५ हजाराची लाच स्विकारतांना अटक

जळगाव प्रतिनिधी । शेतीच्या जागेवर शाळा बांधल्यानंतर तहसीलदारांनी नोटीस बजावल्यानंतर तक्रारदारावर कारवाई टाळण्यासाठी १५ हजाराची लाच घेणाऱ्या अमळनेर तालुक्यातील जवखेडे येथील तलाठ्यास एसीबी पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांचे अमळनेर तालुक्यातील जवखेडे शिवारात शेत आहे. शेताच्या जागेवर शाळेसाठी बांधकाम केले आहे. तहसीलदार यांनी नोटीस बजावल्यानंतर तक्रारदाराने 32 हजार ४२६ रूपयांचा दंड देखील भरला मात्र त्यानंतरही कारवाई करण्याची धमकी देवून पुढील कारवाई टाळण्यासाठी १५ हजार रूपयांची लाच जावखेड येथील तलाठी मुकेश सुरेश देसले (वय-४५) रा. प्लॉट नं.54, सुर्या नगर,नकाना रोड,आधार नगरजवळ धुळे यांनी मागितली. तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागात तक्रार दिल्यानंतर आज दुपारी १२.३० वाजता सापळा रचून १५ हजार रूपयांची लाच स्विकारतांना तलाठी देसले याला रंगेहात पकडले.

यांनी केली कारवाई
उपअधिक्षक गोपाल ठाकुर, पोलीस निरीक्षक निलेश लोधी, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, सफौ.रविंद्र माळी, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, पोहेकॉ.सुरेश पाटील, पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ,पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर यांनी कारवाई केली.

Protected Content