Home Cities जळगाव दिल्लीतील पथसंचलनासाठी विद्यापीठाच्या गायत्री पाटील यांची निवड

दिल्लीतील पथसंचलनासाठी विद्यापीठाच्या गायत्री पाटील यांची निवड


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । नवी दिल्ली येथे  १ ते ३१ जानेवारी २०२४ दरम्यान होत असलेल्या प्रजासत्ताक दिन पथसंचलन शिबीरासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गायत्री पाटील या विद्यार्थिनीची निवड झाले आहे.

गायत्री पाटील ही विद्यार्थीनी जी.टी.पी. महाविद्यालय, नंदुरबार येथे शिकत आहे. नवी दिल्लीच्या युवक व क्रीडा मंत्रालयाच्या रासेयो कार्यक्रम सल्लागार यांच्या पत्रान्वये विद्यापीठाला ही निवड झाल्याचे कळविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील १२ विद्यार्थ्यांची या शिबिरासाठी निवड झाली आहे. त्यामध्ये गायत्री पाटील हीचा समावेश आहे. या निवडीबद्दल कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, रा.से.यो. संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound