रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील विवरे बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाग्यश्री पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
विवरे बु॥ग्रामपंचायतीच्या निवडणूकीनंतर १२ फेबुवारीला उपसरपंच निवड झाल्यावर महिनाभरातच २६ मार्च रोजी उपसरपंच निलिमा सणंसे यांनी राजीनामा दिला होता. परंतु राजीनामा पत्रावर बनावट सह्या असल्याचा आक्षेप वासुदेव नरवाडे गटाने घेतल्याने राजीनामा नामंजूर झाला. परत उपसरपंच यांनी २३ एप्रील रोजी राजीनामा दिल्याने मासिक बैठकीत राजीनामा मंजूर झाल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवडणुक गुरुवार रोजी सरपंच इनुस तडवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत वासुदेव नरवाडे गटाच्या सौ भाग्यश्री विकास पाटील यांनी विपीन राणे व शिवाजी पाटिल यांचे गटाचे विनोद मोरे यांचा एकमताने पराभव केल्याने उपसरपंचपदी सौ भाग्यश्री पाटिल यांची निवड बहुमताने करण्यात आली.
निलीमा सणसे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी वासुदेव नरवाडे गटाकडून सौ भाग्यश्री पाटिल यांनी अर्ज भरला होता. तर शिवाजी पाटील, विपीन राणे गटा कडून विनोद मोरे, मनिषा पाचपांडे यांनी अर्ज दाखल केला होता. मनिषा पाचपांडे यांनी माघार घेतल्या नंतर भाग्यश्री पाटील व विनोद मोरे यांच्यात मतदान पद्धतीने निवडणूक झाली. झालेल्या बैठकीत भाग्यश्री पाटिल यांना १५पैकी ८ मते मिळाल्याने त्यांची उपसरपंच पदी ग्रामविकास अधिकारी अरविंद कोलते यांनी निवड जाहीर केली. या प्रसंगी नवनिर्वाचित उपसरपंच भाग्यश्री पाटिल यांचा सत्कार करण्यात आला.
या बैठकीला सरपंच इनुस तडवी , उपसरपंच भाग्यश्री पाटील , ग्रा.प. सदस्य वासुदेव नरवाडे, नेहा पाचपांडे, युसुफ खाटिक, रेखा गाढे , अमीनाबी शे. इस्माईल, ज्योती सपकाळ, दिपक राणे, पुनम बोंडे, मनिषा पाचपांडे, विनोद मोरे, विपीन राणे, शिवाजी पाटिल, निलीमा सणंसे, ग्रामविकास अधिकारी अरविंद कोलते उपस्थित होते.
गेल्या तीन महिन्यात व्यक्तीगत विरोधा शिवाय एकही काम मार्गी लागले नाही. म्हणून निवडणूकीत जनतेला दिलेल्या आश्वासनांच्या पुर्ततेसाठी माजी सरपंच तथा पॅनलप्रमुख वासुदेव नरवाडे या अनुभवी नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांचे गटात सहभागी झाली. या ठिकाणी काम करण्यासाठी संधी आहे. उपसरपंचपदी माझी निवड करून विकास कामे करण्यासाठी संधी निर्माण करुन दिल्याने विरोध तथा भेदभाव न करता गावाचा सर्वांगीण विकास करणार आहे. पती विकास पाटिल यांच्या जनसंपर्क व काम करण्याच्या हातोडीने अटीतटीच्या लढतीत जिंकून आली. संधीचे सोनं करुन सर्वांगीण विकास करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच सौ भाग्यश्री पाटिल यांनी सांगितले.