मुक्ताईनगर उपजिल्हा रूग्णालयातील लसीकरण केंद्रावर नागरीकांची तोबा गर्दी

मुक्ताईनगर प्रतिनिधी । शहरातील लसीकरण केंद्रावर सध्या लसी उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण कमी प्रमाणावर होत आहे. दरम्यान आज शहरातील उपजिल्हा रूग्णालयातील लसीकरण केंद्रावर नागरीकांनी लसीकरणासाठी मोठी गर्दी केली होती. याठिकाणी कोरोनाच्या नियम आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. 

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की कोरोना ची साखळी तुटावी यासाठी सरकार कडून लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे. परंतु नियोजनाअभावी मुक्ताईनगर येथील लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांनी भरपूर प्रमाणात गर्दी केली होती. नागरिक सकाळी ४ वाजेपासून दुपारपर्यंत उन्हा-तानात उभे होते. परंतु तेथे उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांकडून कुठलीही व्यवस्थित माहिती बाहेरील लोकांना दिले जात नाही अशाने कोरोना संपणार की वाढणार नागरिकांचा वशिलेबाजी चा आरोप नागरिकांचा असा आरोप आहे की आम्ही सकाळपासून उभे आहेत परंतु वशिलेबाजी करून मागील लोकांना येथे लस दिली जाते तसेच लस उपलब्ध नाही असे सांगण्यात येते व गुपचूप रूममध्ये लसीकरण करण्यात येते असा आरोप नागरीकांनी केला होता. यासंदर्भात आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून माहिती जाणून घेतली असता त्यांच्याकडून उध्दटपणाने बोलत असल्याचा आरोप उपस्थित नागरीकांनी केला आहे.

Protected Content