वेटलिप्टींगच्या राष्ट्रीय स्पर्धेत रावेरच्या उदय महाजनचा डंका !

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अरूणाचल प्रदेशची राजधानी असणार्‍या इटानगर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय वेटलीप्टींग स्पर्धेत रावेर येथील उदय महाजनने तब्बल तीन पदके पटकावली.

इटानगर अरुणाचल प्रदेश येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत जळगाव जिल्हा वेट लीफ्टींग संघटनेचे खेळाडू उदय अनिल महाजन यांनी महाराष्ट्र राज्य वेट लिफ्टीग संघटने चे प्रतिनिधित्व करत ५५ किलो वजनी गटात १०५ किलो स्नॅच आणि १३६ किलो जर्क असे २४१ किलो वजन उचलून ज्युनिअर स्पर्धेत सुवर्ण पदक, सीनियर (आंतर राज्य) स्पर्धेत सुवर्ण आणि ओव्हरऑल गटात रौप्य पदक पटकाले . एकाच स्पर्धेत तब्बल २ सुवर्ण आणि १ रौप्य पदक असे ३ पदक पटकविले. तर मुलींच्या ४० किलो युथ गटात अश्विनी शांताराम चौधरी हिला ५ व्या क्रमंकावर समाधान मानावे लागले.

उदय महाजन या खेळाडूने यापूर्वी देखील अनेक राष्ट्रीय स्पर्धेत खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्ण रोप्य आणि कास्य पदकांची कमाई केली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धत देखील या खेळाडू कडून पदकाची अपेक्षा आहे, असे उदय चे प्रशिक्षक पोलीस हवालदार योगेश महाजन फैजपूर पोलीस ठाणे यांनी बोलताना सांगितले.

खेळाडूंच्या या यशा बद्दल जळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष प्रकाश मुजुमदार सर पदाधिकारी संजय मिसर, प्रदीप मिसर, प्रकाश बेलकर, राजेश शिंदे, अमोद महाजन, यशवंत महाजन, योगेश महाजन यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

या सर्व खेळाडूंना जिल्हा संघटनेचे प्रशिक्षक संदीप महाजन, तसेच क्रीडा शिक्षक अजय महाजन, युवराज माळी सर यांचे मार्गदर्शन मिळाले.

Protected Content