Home क्रीडा चाळीसगावात नमो चषक स्पर्धेच्या अंतर्गत भव्य मॅरेथॉन स्पर्धा !

चाळीसगावात नमो चषक स्पर्धेच्या अंतर्गत भव्य मॅरेथॉन स्पर्धा !


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टी, व आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी नमो चषक-२०२४ अंतर्गत भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, भारतीय जनता पक्षाच्या वतीने जानेवारी महिन्यात नमो चषक-२०२४ अंतर्गत ठिकठिकाणी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याच्याच अंतर्गत सोमवार दिनांक १ रोजी मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे.

सकाळी सहा वाजता मॅरेथॉन स्पर्धेस प्रारंभ होणार आहे. याला खरजई नाका भडगाव रोड येथून सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक रेल्वे ब्रिज- महाराणा प्रताप चौक (कॉलेज पॉइंट) मालेगाव रोड मार्गे शिवनेरी पार्क येथे समारोप होणार आहे.

यात महिला आणि पुरूष यांच्यासाठी स्वतंत्र गट ठेवण्यात आलेले आहेत. यातील विजेत्यांना अनुक्रमे प्रथम बक्षीस ५००१; द्वितीय बक्षीस ४००१; तृतीय बक्षीस ३००१;चतुर्थ बक्षीस २००१ आणि पाचवे बक्षीस रूपये १००१ ठेवण्यात आले आहेत. सदर स्पर्धेत तालुक्यातील स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन आमदार मंगेशदादा चव्हाण आणि भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound