अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्या प्रचाराला प्रारंभ

anil chaudhari 1

फैजपूर, प्रतिनिधी | रावेर मतदार संघातील अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी तालीक्यातील पाल येथे आज (दि.८) चैतन्य लक्ष्मण बापू यांच्या आश्रमात नारळ वाहून व बाबा पीर फत्ते शाह वली यांच्या दर्गात चादर चढवून प्रचारचा शुभारंभ केला. पालसह गुलाबवाडी, मोरव्हाल, ताड जिन्सी, विश्राम जिन्सी, आभोडे खु, आभोडे बु या गावातून त्यांनी प्रचार रॅली काढली. यावेळी काही ठिकाणी महिलांनी चौधरी यांचे औक्षण केले.

 

त्यांच्यासोबत माजी आमदार संतोष चौधरी यांच्यासह रावेर-यावल मतदारसंघातील मान्यवर माजी सरपंच पुंडलिक सोनार, माजी सरपंच रमेश येवले, कृउबास सभापती सचिन चौधरी, मुनाफ तडवी, माजी नगराध्यक्ष शीतल पाटील, राजू तडवी, नगरसेवक कुर्बान शेख, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, भुरेखा तडवी, नासिर पठाण, प्रदीप जाधव, दिलीप जाधव, मनोज चौधरी, जखा राठोड, जितू लोहार, अतुल तडवी, रंगा पवार, पंकज वाघ, अनवर खाटीक, सद्दाम मण्यार, रफिक तडवी  पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content