पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या ‘विद्यार्थी विकास विभागा’मार्फत आयोजित ‘आंतर महाविद्यालयीन नियतकालिक’ लेखन स्पर्धेत पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयातील मयुरी कैलास पाटील या विद्यार्थीनीच्या वैचारिक लेखास द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले.
तृतीय वर्ष पदार्थ विज्ञान विभागाची विद्यार्थिनी मयुरी कैलास पाटील हिने महाविद्यालयाचे नियतकालीक वसंत बहारमध्ये मराठी विभागात ‘भारतीय संविधानाचे महत्व’ हा वैचारिक लेख प्रसारीत केला. या लेखाचे विद्यापीठामार्फत परिक्षण झाले आणि मयुरी द्वितीय पारितोषिकाची मानकरी ठरली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या ‘विद्यार्थी विकास विभागा’मार्फत आयोजित ‘आंतर महाविद्यालयीन नियतकालीक’ स्पर्धेत पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयातील तृतीय वर्ष पदार्थ विज्ञान विभागाची विद्यार्थिनी कु मयुरी कैलास पाटील हिने महाविद्यालयाचे नियतकालीक वसंत बहारमध्ये मराठी विभागात ‘भारतीय संविधानाचे महत्व’ हा वैचारिक लेख प्रसारीत केला. या लेखाचे विद्यापीठामार्फत परिक्षण झाले आणि मयुरी द्वितीय पारितोषिकाची मानकरी ठरली.
तिच्या या यशाबद्दल आज दिनांक 8 एप्रिल रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार वसंतराव मोरे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे संचालक तथा नगरसेवक रोहन मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डि.आर.पाटील, प्रा.व्हि.एन.कोळी, विजय पाटील, नियतकालिकेचे संपादक प्रा.जे.बी.पाटील उपस्थित होते. मयुरीच्या यशाबद्दल संचालक मंडळ, संपादक मंडळातील सर्व सदस्य, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन आणि कौतुक केले.