नियमितसोबत बॅकलॉगच्या परीक्षा घ्या : अभाविप

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने नियमितसोबतच बॅकलॉगच्या परीक्षा घ्याव्यात अशी मागणी अखील भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे एका निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

कोरोनामुळे विद्यापीठ विविध विषयांचे बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊ शकले नाही. त्यामुळे विद्यार्थी बॅकलॉगच्या परीक्षा देण्यापासून वंचित राहिले आहेत; परंतु अंतिम वर्षाच्या परीक्षा घेत असताना त्यांच्या सर्व सत्राच्या बॅकलॉगच्या परीक्षा विद्यापीठाने घेतलेल्या आहेत.

त्याचप्रमाणे विद्यापीठाने प्रथम, द्वितीय व तृतीय नियमित सत्राच्या परीक्षा विद्यापीठ प्रशासनाने आयोजित केले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरताना बॅकलॉगच्या विषयांचे देखील शुल्क भरले आहे. त्यामुळे नियमित सत्राच्या परीक्षा सोबतच बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांची प्रथम, द्वितीय व तृतीय सत्राची परीक्षा देखील घेण्यात यावी. अशी मागणी अभाविपने कुलगुरूकडे निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी महानगर मंत्री आदेश पाटील, आदित्य नायर, चंद्रकांत पाटील व आकाश पाटील उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: