भुसावळ Bhusawal -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भोरगाव लेवा पंचायतीच्या वतीने येथील संतोषी माता सभागृहात परिचय मेळावा आणि वर-वधू सुची प्रकाशनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
भोरगाव लेवा पंचायतीने रविवारी समाजातील विधवा, विधूर, प्रौढ, शेतकरी, अपंग अशा वधू-वरांची सूची प्रकाशन व परिचय मेळावा घेतला. या मेळाव्याला राज्यभरातून अनेक वधू-वर व त्यांचे पालक उपस्थित होते. याप्रसंगी भोरगाव लेवा पंचायतीचे ललित पाटील, भुसावळ शाखेचे अध्यक्ष ऍड. प्रकाश पाटील, सचिव डॉ. बाळू पाटील, आरती चौधरी, महेश फालक. शरद फेगडे, मंगला पाटील, डिगंबर महाजन, आर.जी.चौधरी, परीक्षित बर्हाटे, ज्योत्स्ना बर्हाटे, नीला चौधरी, चंदन महाजन, सुनील खडके, विनीत हंबर्डीकर, मनोज जावळे, पल्लवी ढाके आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रकल्प चेअरमन आरती चौधरी यांनी प्रास्ताविकात, जास्तीत जास्त वधू-वरांना नोंदणी शक्य व्हावी यासाठी गुगल फॉर्मची सुविधा उपलब्ध करून दिली. ऑनलाइन अर्ज स्वीकारले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हे काम अव्याहत सुरू असल्याचे सांगितले. याप्रसंगी प्राची राणे, मनोज जावळे, दिनेश राणे, वासुदेव इंगळे यांचा सत्कार झाला.
याप्रसंगी ऍड.प्रकाश पाटील व माजी आमदार नीळकंठ फालक यांनी मनोगत व्यक्त केले. परिचय सूचीचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमात नागपूर, पुणे, मुंबई, इंदूर, अकोला, नाशिक, यावल, रावेर येथून पालक व वधू-वरांसह सुमारे ४०० जण मेळाव्यात सहभागी होते. त्यापैकी १० मुली व १७ मुलांनी परिचय दिला. या मेळाव्यात एका घटस्फोटित मुलीचा विवाह जुळला, तर एका विधवा मुलीचा विवाह ठरण्याची प्रक्रिया सुरू झाली.