एसडीआरएफची बोट बुडाली : तीन जवानांचा मृत्यू

नगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणात बुडालेल्यांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या एसडीआरएफच्या पथकाची बोट पाण्यात बुडून तीन जवांनाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याबाबतची माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे प्रवरा नदीत एसडीआरएफची बोट उलटण्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून दोघांचा शोध सुरू आहे. प्रवरा नदीपात्रात आवर्तनामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आहे. यात अकोले तालुक्यातील सुगाव मधील पात्रात पोपट जेडगुले (वय २५), अर्जून रामदास जेडगुले (वय १८) हे दोन्ही जण पोहण्यासाठी उतरले असतांना बुडून त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, यातील दोन्ही मुलांचा शोध घेण्यासाठी राज्य आपत्ती निवारण दल अर्थात एसडीआरएफचे पथक एका बोटीतून नदीपात्रात शोध घेत होते. शोध सुरू असतांनाच जवानांची बोट उलटली. यात तीन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघे बेपत्ता झाले आहेत. यामुळे दुसर्‍या पथकाच्या माध्यमातून या जवानांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

Protected Content